वारकरी संत परंपरेचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान :- हभप संजय महाराज पाचपौर.. — भागवत महाराज साळुंके लिखित “भाव अक्षाराची गाठी” पुस्तकाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संत परंपरेचे मोठे योगदान आहेवारकरी संत परंपरेचे मोठे योगदान.जगाच्या उध्दारासाठी आपले आयुष्य चंद्राप्रमाणे वेचणारी ही संत मंडळी जगत्कल्याणार्थ अनेकविध प्रयत्न करतात, त्यापैकीच एक म्हणजे त्यांचे साहित्य. संतांच्या पश्चात त्यांच्या संत विचारांचा अभ्यासू भुमिकेतुन हभप भागवत महाराज साळुंके लिखित “भाव अक्षाराची गाठी” हे पुस्तक समाजास मार्गदर्शन ठरेल असे प्रतिपादन रामायणाचार्य संजय महाराज पाचपौर यांनी व्यक्त केले.

           आळंदी येथील अमृतनाथ स्वामी मठात वारकरी दर्पण प्रकाशित हभप भागवत महाराज साळुंके लिखित “भाव अक्षाराची गाठी” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी संजय महाराज पाचपौर बोलत होते.यावेळी पुस्तकाचे प्रकाशन हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

              याप्रसंगी संजय महाराज पाचपोर, ॲड.जयंवत महाराज बोधले, प्रमोद महाराज जगताप, सचिन महाराज पवार, माधवदास महाराज राठी, नरहरी महाराज चौधरी, पुरुषोत्तम महाराज पाटील, वेदांत महाराज चोपदार, अजित वडगावकर, विश्वंभर पाटील, श्रीधर घुंडरे पाटील, प्रभुराज महाराज पाटील, प्रसाद महाराज माटे उपस्थित होते.

            वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ किर्तनकार हभप स्व. बाबामहाराज सातारकर यांचे नुकतेच निधन झाले त्यानिमित्ताने या कार्यक्रमात त्यांना वारकरी संप्रदायाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.