नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याप्रसंगी महाआरोग्य शिबीर घेण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष डॉ.ललित हमने सदस्य पंचायत समिती साकोली कार्यक्रमात प्रमुख उपस्थित उपसरपंच रिगण राऊत ग्रा. प. एकोडी , ग्रामपंचायत सद्स्य भावेश कोटांगले ,वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एन .मेश्राम मॅडम, वैद्यकीय अधिकारी ममता लांजेवार मॅडम, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. रहांगडाले मॅडम,रुग्णकल्याण समिती सदस्य लालचंद गणवीर ,एकनाथ कोटांगले यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन संपन्न झाले.
या शिबिरा मध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत दैनंदिन तपासणी करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन वाय. व्ही.अहिर आरोग्य सहाय्यक तथा प्रभारी औषध निर्माण अधिकारी, तर आभार घाटबांधे आरोग्य सहाय्यक यांनी केले
शिबिर यशस्वी करण्यासाठी भुवन गहाणे, डॉ.युगन्धरा पाखमोडे, डॉ. शृंगाली फुलबांधे, राजू बोरकर, कु. योगिता गोंधळे, कु. जयश्री परसगडे, सी.बी.सपकाळ, कु. रुपाली राऊत, डी एम मुनेश्वर, बि एस कांबळे, टी . एस जांभोरे, नितीन श्यामकुवर, सुरज साखरे, राखडे सिस्टर, कमलाबाई लांडगे यांनी सहकार्य केले.