युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
जि प शाळा वाकपूर(दादापूर)येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गावातील प्रतिष्ठित राजूभाऊ ढवळे हे होते तर प्रमुख उपस्थिती रामेश्वर गडलिंग उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सूरज मंडे मुख्याध्यापक आणि रंजना गडलिंग अंगणवाडी सेविका यांची होती.
राजू भाऊ ढवळे यांनी माता रमाई चे जीवनावर आधारित गीत सादर केले. बाबासाहेबांचे जडणघडणीत जेवढा वाटा बाबा रामजी यांचा आहे त्यापाठोपाठ वाटा माता रमाई चा ही असल्याचे प्रतिपादन सूरज मंडे यांनी केले तसेच त्यांनी माता रमाईचे बालपण, वैवाहिक जीवनातील कर्तव्य, त्याग, सहकार्य, व्यक्तिमत्वाचे गुण वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ५ ची विद्यार्थिनी अनुष्का धनराज गडलिंग हिने केले तर आभार प्रदर्शन परी अतुल कराळे हिने पार पाडले. या कार्यक्रमाला सुजाता गडलिंग, नंदिनी गडलिंग, किंजल ढवळे, अभिनव ढवळे, रितिका गडलिंग, एर्तीना पवार, प्रतीना पवार, आरुषी गडलिंग, राजश्री पवार, यांचेसह बहुसंख्य नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.