दखल न्यूज भारत
विजय शेडमाके.
गडचिरोली ते भानु प्रतापपूर मंजूर झालेल्या रेल्वे लाईन अंतर्गत धानोरा शहरात रेल्वे स्टेशन द्यावे यासंबंधाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना निवेदन देताना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,तालुका महामंत्री भाजपा विजयजी कुमरे,जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सारंग साळवे उपस्थित होते.
निवेदन दिल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी तत्काळ धानोरा शहरात रेल्वे स्टेशन मंजूर केले आहे.
यामुळे खा.अशोक नेते यांना धानोरा येथे रेल्वे स्टेशन मंजूर करुन घेण्याला यश आले आहे.