नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे आलेबेदर येथे 6, 7 मार्च ला होणाऱ्या बौद्ध धम्म परिषद या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी सर्व उपासक उपसिका यांना व्हावी व या कार्यक्रमासाठी दान मिळावा यासाठी ही भिक्कु संघाची रॅली एकोडी सुमेध बुद्ध विहार इथे पोहचली.
त्या प्रसंगी भन्तेजी यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, कुंदा जांभुळकर ,रहिला कोचे यांनी स्वागत केले.
या प्रसंगी सुमेध बुद्ध विहार समितीचे सचिव कार्तिक मेश्राम, प्रबोधनकार मनोज कोटांगले, झिंगर थुलकर, शेषराज मेश्राम, सित्तम ईलमकार, महेंद्र भैसारे, कौशल्या कोटांगले, वछला जांभुळकर, अध्यक्ष मिथुन जांभुळकर, उपाध्यक्ष ललित कोटांगले ,फिरोज कोटांगले उपस्थित होते.