कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचा आदेशानुसार ९ फेब्रुवारी ला राज्यभरात सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्र , उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय या ठिकाणी महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे उद्या गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ला सकाळी ९:३० ते सायंकाळी ४:३० वाजता पर्यंत भव्य महारक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
या आरोग्य शिबीरात प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी मा.डाॅ शशांक राठोड , डॉ तेजस्वीनी गोतमारे , डॉ नाझरा मॅडम सह आदि स्टाॅप च्या मदतीने नागरिकांच्या दमा , अस्थमा , रक्त तपासणी , बीपी , शुगर तापासणी सह विविध प्रकारच्या बीमारी ची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ शंशाक राठोड सर यांनी दिली.
गरजु जनतेला आरोग्य सुविधा निशुल्क मिळण्याकरिता व गरजुंना रक्ताची मदत करण्याकरिता आणि कुणाचे जीव वाचविण्याकरिता महारक्तदान शिबीराचा आणि आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे कडकडीचे आव्हाहन कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ शशांक राठोड यांनी केले आहेत .