कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-
घरी कोणी नसताना चिचंभवन येथील घरी कोणी नसताना अज्ञात चोरानी रोख १२ हजार २७० रुपये चोरून नेले असल्याची घटना घडली आहे.
पो.स्टे. पारशिवनी अंतर्गत १० कि.मी. अंतरावरील मौजा चिचभवन येथे फिर्यादी मांगिलाल सुखराम उईके, वय २४ वर्ष, रा. चिचभवन ता. पारशिवनी व फिर्यादीची आई हे आप आपले कामावर घरून निघुन गेले होते.घरी कोणी नसताना अज्ञात चोराने फिर्यादी मांगीलाल सुखराम उईके च्या घराचा दरवाजा नसलेल्या खुल्या घरातुन बॅगमध्ये ठेवलेले रोख १२हजार २७० /- रुपये चोरून नेले आहे.
चोरीच्या प्रकरणी फिर्यादी मागीलाल उईके यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. पारशिवनी येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३८० भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार गंगाप्रसाद बरकडे पो.स्टे पारशिवनी हे करीत आहेत.