कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- चोरट्याने खिडकी फोडून लोखंडी सळाकीने दार उघडले आणि स्वयंपाकघरात प्रवेश केला.यात त्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेले.
ही घटना पारशिवनी शहरात सोमवारी (दि. ६) रात्री घडली. नीलू नामदेव भुजाडे (रा. प्रभाग क्र ७ पारशिवनी) या सोमवारी रात्री भजनाच्या कार्यक्रमानिमित्त घराच्या दाराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या,त्यामुळे घरी कुणीही नव्हते.
त्या मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास घरी परत आल्या असता,त्यांना स्वयंपाकघराचे दार उघडे दिसले.शिवाय,स्वयंपाकघरातील खिडकीच्या काचाही फुटल्या असल्याचे आढळून आले.
त्यांनी खोलीतील कपाटाची तपासणी केली असता,खाली पडून आलेल्या अस्ताव्यस्त साहित्यामुळे घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली.
पोलिस सुत्रा व्दारे मिळाली माहीती नुसार तक्रारदार सौ. निलु नामदेव भुजाडे वय ५० वर्ष राहणार प्रभाग क्रमाक ७ पारशिवनी यांची तक्रारी वरून पोलिसानी अपराध क्रमांक २८/२३ अन्वये कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा नोद करून अज्ञात आरोपी च्या शोधात पोलिस तपास करीत आहेत.
प्राप्त माहीती नुसार अज्ञात चोरानी दि.६ फरवरीचे ८.३० वाजता पासुन रात्रि १२. वाजता च्या दरम्यान रात्रि रोख नगदी 10000/ रुपये व एक नग सोन्याचा नेकलेस 25 ग्रॅमचा किमंती 45000/ रुपये,एक नग बारीक सोन्याचा गोफ 10 ग्रॅमचा किमती 45000/ रुपये, एक नग सोन्याचा लॉकेट व ठुसी 6 ग्रॅमची किमंती 20000/ रुपये, एक नग सोन्याची अंगठी ज्यावर केसरी रंगाचा चौकोनी खडा असलेली 6 ग्रॅमची किमती 25000/- रुपये, एक नग सोन्याची अंगठी बदामी आकाराची 5 ग्रॅमची किमंती 25000/ रूपये, एक नग सोन्याची अंगठी बदामी आकाराची 2.5 ग्रॅमची किमंती 13500/- रुपये, व पायातील चांदीचे चाळ 7 तोळ्याचे किमती 7500/रुपये असा एकुण 1, लाख 91 हजार रुपयाचा माल
चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
चोरट्याने आधी खिडकी फोडून लोखंडी सळाकीने दाराची आतील कडी उघडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. मात्र, ठोस सुगावा मिळाला नाही. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करित अज्ञात आरोपी चा शोधने सुरू केला आहे.