कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत धरम नगर येथे बंद घरातुन चोरट्यांनी एलईडी टीव्ही आणि पर्स असा एकुण १३,५०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेले असल्याची घटना घडली.या संदर्भात कन्हान पोलीसांनी सौ.कविता कापटे यांचा तक्रारी वरून पोस्टेला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक ०६ फ्रेब्रुवारी ला सकाळी ११.०० वा. ते ०२.३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी नामे सौ.कविता विजय कापटे वय ३५ रा.धरम नगर कन्हान ही आपल्या घराच्या मागील दाराची कुंडी आतुन बंद करून घराला ताला लावुन नवीन किरायाची रूमची साफ – सफाई करण्या करीता गेली असता,चोरांनी त्यांच्या रुममधून एलई डी टिव्ही व पर्स चोरून नेले.
परत आल्यावर घराचा लॉक उघडुन पाहिले असता एल ई डी टिव्ही किंमती अंदाजे ९ हजार रुपये व पर्स मध्ये ठेवलेले ३५०० रुपए असा एकूण १२,५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांने मागील दाराची कुंडी उघडुन चोरुन नेल्याने लक्षात आले.
कन्हान पोलीसांनी सौ.कविता कापटे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४ , ३८० भादंवि कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सदाशिव काटे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .