डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी: आदिवासी उपयोजना अंतर्गत निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी ते कोत्तूर (चिंचगुंडी) रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
नागरिकांची अडचण दूर व्हावी,अहेरी ते कोत्तूर पर्यंत गुळगुळीत रस्त्याचे काम व्हावे यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पाठपुरावा करून निधी खेचून आणली.नुकतेच या रस्ता बंधकामाचे भूमिपूजन भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते संपन्न झाले असून रस्त्याचे काम झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न होताच त्यांनी त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश सदर विभागाला दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार,अरुण मुक्कावार,तालुका अध्यक्ष श्रीनवास विरगोनवार,कमला आत्राम,सुशीला कस्तुरवार,राजू आत्राम,सीताराम कुंमरी, रामण्णा कस्तुरवार,बाबुराव तोरेम,मखमुर शेख,तिरुपती मडावी,ताजू कुळमेथे,संतोष येमुलवार,शामराव पानेम,गंगाराम पानेम,माजी सरपंच पुष्पा आत्राम,लक्ष्मण पानेम,शंकर मडावी,यशवंत आत्राम,गणेश आत्राम आदी उपस्थित होते.