शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
गरडापार येथे जि.प.प्रा.शाळा आयोजित बालक्रीडा व सांस्कृतिक संमलेनचे उदघाटन शिक्षक नेते एकनाथ थुटे गुरुजी यांनी करीत त्यांनी बालक्रीडा मध्ये आजतगाजत तेच खेळ राहत असले तरी आजच्या स्थितीत विदेशी खेळ आयोजनात घेण्यात यावे असे सांगत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पोहनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
गरडापार येथील जि.प.प्राथमिक शाळा केंद्र बीट स्तरीय क्रीडा संमेलन प्रसंगी माजी सभापती विनोद चोखरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संचालक कैलास धनोरे, विडिओ बोढाने, शामरावजी नन्नावरे, रमेश मेहरकुरे शिक्षक सह आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.