
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भद्रावती.दि.९ :- वरोरा विधान सभेचे निर्वाचित आमदार करण संजय देवतळे यांनी विविध विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा सपाटा सुरू असून संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांच्या बैठकी शासकीय विश्रामगृहा येथे संपन्न झाल्या असून अनेक समस्या निकाली लावण्याचा धडका आमदार करण देवतळे यांनी सुरू केला आहे.
वरोरा येथील विश्रामगृहात पहिल्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद विभाग संदर्भात नगरपरिषद कार्यकारी अधिकारी बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
त्यावेळी वरोरा शहरातील मुख्य समस्या असलेली पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करावी व त्यासाठी काय काय सहकार्य पाहिजे ते मला सांगा तसेच प्रक्रिया कोणत्या ठिकाणी अडचण निर्माण झाले आहे. त्याबाबत सुद्धा मला त्वरित अहवाल द्यावा असे सांगितले.
तसेच शहरातील विविध समस्या अधिकाऱ्यांना सांगितल्या तसेच नागरिकांना होणाऱ्या अडचणी याबाबत सुद्धा आमदार देवतळे यांनी समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकामा विभाग अंतर्गत कोणकोणते काम सुरू आहेत व कोणत्या स्थितीत आहेत याबाबत सुद्धा माहिती घेऊन त्वरित अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करा असे आदेश सुद्धा आमदार करण देवतळे यांनी संबंधित उपविभागीय अभियंता यांना दिले.
लगेच दुसऱ्या दिवशी महसूल विभाग व ग्राम विकास खाते (पंचायत समिती विभाग) अंतर्गत येणाऱ्या सर्व समस्या जाणून घेतल्या व जनतेकडून प्राप्त झालेल्या समस्या व तक्रारी या बैठकीत त्याचे निराकरण करण्यात आले व कोणत्याही ग्रामीण भागातील असो की शहरे भागातील असो लोकांना त्रास झाला नाही पाहिजे त्यांचे सर्व काम त्वरीत झाले पाहिजे याबाबत आपण दखल घ्यावी असे सुद्धा संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आमदार करण देवतळे यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
यावेळी नगर परिषद सीईओबोबडे, उपविभागीय अभियंता लोहे, तहसीलदार कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर तसेच सर्व विभागाचे जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचारी विश्रामगृहामध्ये उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या आढावा बैठकामुळे वरोरा भद्रावती मतदार संघात आमदार करण देवतळे यांच्या कार्यशाळेचे कौतुक केले जात आहे.
या आढावा बैठकीमध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजप चे नेते डॉ. रमेश राजुरकर, विजय मोकाशी, बाजार समिती संचालक बाळू भोयर, विठ्ठल लेडे, विलास गहणेवार, बाबासाहेब भागडे, राहुल बंदुरकर, रोहिणी देवतळे, स्विय सहाय्यक युवराज इंगळे, सरपंच देवानंद महाजन व इतर प्रमुख कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.