नऊ महिने नऊ दिवस झाले तरी आश्वासन पुरे होईना!.. — शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंत्या विरोधात आंदोलनाचा ईशारा..‌

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

    चार महिन्यांपूर्वीच भिसी ते सावर्ला मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र, जडवाहतुकीमुळे या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत.दरम्यान, या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

        सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता उपगलावार यांना निवेदन दिले होते.त्यांनी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल,असे आश्वासन दिले होते.

     भिसी-सावर्ला मार्गाची दयनीय अवस्था झाली होती.त्यामुळे या भागातील नागरिकांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही..

    सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे डांबरीकरण केले.या मागनि जडवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते.त्याचा परिणाम हा मार्ग उखडला आहे.

       त्यामुळे या मागनि ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच जडवाहतूक रोखली होती. 

      त्यावेळी प्रभारी उपविभागीय अभियंता उपगंलावार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.तेव्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल,असे आश्वासन दिले होते.मात्र,अजून पर्यंत कोणतीही उपायोजना केली नाही.

       यावेळी अनिल शेंडे,चंदशेखर गिरडे,दीपक ठोंबरे,संभा देशमुख,राकेश भुजाडे,संदीप नन्नावरे,देवा कामडी,महादेव मुंगले,प्रशांत काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.