चिमूर तालुक्यातील निराधार,अपंग,विधवा लोकांचे अनुदान त्वरित द्या.:- उपसरपंच अशोक चौधरी.. — अन्यथा चिमूर कार्यालयावर भिक मागो आंदोलन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

       चिमूर तालुक्यातील निराधार, अपंग,विधवा व वृद्ध लाभार्थी गेल्या तीन ते चार महिन्यापासून अनुदांपासून वंचित असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे.यामुळे त्यांना दरमहा मिळणारे सानुग्रह आर्थिक सहकार्य त्वरित देण्यात यावे अशा आशयाची मागणी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

         चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना निवेदन देऊन दवाखाना व ईतर गरजा भागविण्याकरिता महिन्याला शासनाकडून पंधराशे रुपये अनुदान मिळत असतो.

      त्यामधून आपल्या दैनंदिन गरजा भागवीत असतात.गेल्या तीन चार महिन्यापासून सदर सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही.त्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून येत्या सात दिवसात लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्यास आपल्या तहसील कार्यालयासमोर चिमूर तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांना घेऊन भिक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांच्याकडून चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना देण्यात आला आहे.

         सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले आहे.