समाजिक कार्यकर्ते प्रदीप अडकीने यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबीर,तथा मेडिकल कॉलेजला व्हिलचेअरचे वितरण….

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

      इंडियन सोशल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (ईस्फार्क), आरवटचा 16 व्या वर्धापनादिनानिमित्त व रक्तदान, नेत्रदान, देहदान, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे प्रेरक इंजि. प्रदीप अडकिने यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे सकाळी 10:30 वाजता रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.

         रक्तदान, नेत्रदान, देहदान, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे प्रेरक सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 16 वर्षा पासुन शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. एखादया सामाजिक उपक्रमाला सातत्याने 16 वर्ष पूर्ण होणे हे काही साधे काम नाही. शासकीय रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना मोफत रक्त मिळून देण्याचे कार्य इंजि. प्रदीप अडकीने यांच्यामुळे पूर्णत्वास येत आहे.

             या शिबिरामध्ये मोहम्मद कैफ, गुणशेखर गुरुमुच्छु, विनोद दुधे, सचिन दुधे, हिमांशू अडकीने, अनुद अडकीने आणि प्रेम गावंडे यांनी रक्तदान केले. या शिबीर मध्ये शासकीय रुग्णालयाचे डॉ. हनुमान, डॉ. रुचिका राठोड, सुखदेव चांदेकर, हर्षिता, अभिलाष कुकडे यांचे सहकार्य लाभले. 

         समाजाचे काही ऋण मानून समाजाला काही देण्याच्या वृत्ती समजून प्रदीप अडकीने यांच्या कडून मेडिकल कॉलेज ला व्हिलचेअर देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर सोनारकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर, प्रा. हर्षिता, डी. के. आरीकर, बाबाराव उंदीरवाडे, भास्कर झलके, पळसकर मॅडम, योगेंद्र इंदुरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ईस्फार्क चे अध्यक्ष सचिन दुधे, विनोद दुधे, रामप्रसाद देशमुख, हिमांशू अडकीने, अनुद अडकीने, अरुण धानोरकर, देव किन्नाके, अनिल रायपूर, प्रेम गावंडे यांचे सहकार्य मिळाले.