
फातिमा माई तू
सखी सावित्रीची
सोबत ओढली
धुरा शिक्षणाची
लाभली शिक्षिका
सिंथिया फरार गं
विद्येची तू वर्धिनी
बनूनी पेरीले ज्ञान गं
लाभला पाठीराखा
उस्मान शेख बंधू गं
ना केली पर्वा कुणाची
शिक्षित केली नारी गं
सोसूनी कष्ट सारे
हात हाती घेतला
सावित्री अन् तू माई
शिक्षण पाया रोवला
नमितो माथा तुजपुढे
तू शिक्षणाची देवता
बनली स्त्री सबला इथे
वंदितो तुजला आता
बाबुराव पाईकराव
डोंगरकडा
9665711514