
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
पहिली मुस्लीम शिक्षिका शिक्षणतज्ज्ञ तथा समाजसुधारक फातिमा शेख यांचा जन्मदिवस आपण साजरा करीत असतो.
फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 मधे पुणे येथे झाला.पहिली मुस्लीम शिक्षिका फातीमा शेख यांचा आज जन्मदिवस आहे.
ज्यांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सोबत मिळुन मुलीसाठी 150 वर्षा अगोदर शिक्षणाची मशाल पेटविली होती.
तेव्हापासून आज 150 वर्षे लोटून सुध्दा बहूसंख्य बहुजना पर्यंत शिक्षणाचा प्रसार प्रचार अजून झालेला दिसून येत नाही.
याच कारण शिक्षणाची धुरा आज आपण सांभाळत असलो तरी आपण लोकांनी आपल्या बहुजना पर्यंत शिक्षण पोहोचविले नाही.
अख्खा विश्व आधुनिक शिक्षणात खुप दूरवर पोहोचले असताना आपल्या भारत देशात बहूजन लोक शिक्षणा पासून वंचित होते.
परंतु त्या काळात सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी प्रज्वलित केलेल्या साक्षरता ज्योतीमध्ये सावित्रीमाई सोबत तेल होऊन जळणाऱ्या त्यांच्या सहपथीक,सोबती असलेल्या फातिमा शेख यांनी मनुवादाच्या नाकावर टिच्चून क्रांतीज्योतीला दिलेली साथ सुवर्णा अक्षरात लिहिण्यासारखी आहे.
देशातील महिलांना निरकक्षरतेच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी या क्रांतिकारी शिक्षिकेने केलेल्या त्यागाचे आपण सर्वांनी स्मरण करून फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अमुल्य कार्यावर प्रकाश टाकण्यास समोर आले पाहिजे.