सावली (सुधाकर दुधे)
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाच्या वतीने सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन संत नारायण बाबा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, सहउद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अक्षय जगताप, तहसीलदार परिक्षित पाटील, नगराध्यक्ष लता लाकडे, नायब तहसीलदार सागर कांबळे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना स्वामी, सूरज बोम्मावार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण सुरमवार, अभियंता आठवले हे उपस्थित होते.
दोन दिवसीय चाललेल्या क्रिकेट सामन्यात पोलीस विभाग, पत्रकार संघ, तहसील विभाग, न्यायालय, वन विभाग, नगरपंचायत ग्रामीण रुग्णालय, व्यापारी असोसिएशन, पंचायत समिती, यांनी सहभाग घेतला तर वनविभाग हे विजयाचे मानकरी तर उपविजेता पंचायत समिती ठरले
सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपल्या सुबक कल्पनेतून सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन केले. यानिमित्ताने सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार संघ यांच्यात एकोप्याचे दर्शन घडवून आणले. ठाणेदार यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.