दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र, देवस्थान येथील यात्रा काळात मंदिरात स्वच्छता मोहीम राबविली जाते अशा स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांना संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा समाजरत्न पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांच्या हस्ते देण्यात आला शाल श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यातून आपला ठसा उमटवणाऱ्या रत्नांना संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड, सचिव आनंद पाथरे, सिनेअभिनेत्री मोहीनी कुडेकर, रविराज इळवे, अशोक माने, बाबासाहेब मेमाने, काशिनाथ नखाते, सागर सणस, महेश कल्राल, सुभाष बोराटे आणि स्वकामचे सदस्य बहूसंख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुनील तापकीर म्हणाले, सदर पुरस्कार हा माझा नसून स्वकाम सेवा मंडळाच्या प्रत्येक घटकाचा आहे, त्यामुळे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांच्या सेवा कार्याचा गौरव आहे. संस्कार प्रतिष्ठानने समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केल्याने जबाबदारी निश्चितच वाढली आहे.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी केले सुत्रसंचलन संस्थेच्या उपाध्यक्षा नम्रता बांदल यांनी केले आभार रंजना जोशी यांनी मानले.