खल्लार/प्रतिनिधी
आजच्या संगणकाच्या युगात मिडीयामध्ये आंतरबाह्य बदल होत आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी वुत्तंपत्र हे पुरक असुन पत्रकार जनसामान्यांच्या समस्यानां आपल्या लेखणीतून वाचा फोडतात.त्यांचे हे कार्य प्रशंसनीय असुन पत्रकारीता हा समाज मनाचा आरसा आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांनी केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने शिवररोडस्थीत गजानन महाराज मंदिरात शुक्रवार (दि.६) पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्यं आयोजक म्हणून तायडे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार गजानन देशमुख तर प्रमुख अतिथीं मध्ये मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील,अक्षय काजे,पत्रकार संजय कदम,अभिजीत देवके,मनोज तायडे आदी व्यासपीठावर उपस्थीत होते. कार्यक्रमाला शहरासह ग्रामीण भागातील पत्रकार,उपस्थीत होते.त्यांना भेटवंस्तु – शाल व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान नायगावच्या नवनिर्वाचित निर्वाचित सरपंच रोशन काळे, वर्षाताई सांगोले, स्वप्निल कावरे,अंकुश दाळु यांचा शाल श्रीफळ देऊन राज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे जनहित तालुकाध्यक्ष गोपाल तराळ,ऊप तालुकाध्यक्ष पंकज कदम, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश राऊत,राम शिंदे,अनिकेत सुपेकर,संदीप झळके,भूषण टेकाडे,शुभम रायबोले,संतोष रामेकर,मयूर कडू,संदीप राणे मनोदीप बनसोड,जीवन इंगळे,सुरेश कुल्लीआप्पा,गणेश चव्हाण,नितीन आखातकर,मनोज नेमाडे,अजय काकडे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गवारे व त्यांच्या चमुने भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज तायडे,संचालन पंकज कदम यांनी केले. तर आयोजनाबाबत पत्रकार संजय कदम यांनी आभार मानलेत.कार्यक्रमाला पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.