नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल ( सीबीएसई व स्टेट ) जमनापूर/साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तिन दिवसीय ज्ञानरंग वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. स्नेहसंमेलनाचे अध्यक्षीय स्थान डॉ. लोकानंद शामरावजी नवखरे, मुख्याध्यापक, नवजीवन विद्यालय अँड ज्यु. सायन्स कॉलेज जमनापूर/साकोली, उद्घाटक डॉ. विक्रमजी अव्हाड, सिविल जज, कनिष्ठ विभाग, न्यायिक मॅजिस्ट्रेट, सडक/अर्जुनी, विशेष अतिथी श्री लोहितजी मथानी, पुलिस अधीक्षक भंडारा जिल्हा, व डॉ. सोमदत्तजी करंजेकर संस्था प्रमुख, वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था, नागपूर, प्रमुख अतिथी शामरावजी नवखरे व देवचंदजी करंजेकर सदस्य, वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था, नागपूर, डॉ. संगिता अव्हाड, सिविल जज, कनिष्ठ विभाग, न्यायिक मॅजिस्ट्रेट, गोंदिया, तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद व प्राचार्य राजीव समरीत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून मा. मुजम्मिल सय्यद यांनी मंचावरील उपस्थित मान्यवरांचे जीवनपरिचय विद्यार्थ्यांना करवून दिले. मंचावरील उपस्थित अध्यक्ष, उदघाटक, विशेष अतिथी व प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासपूर्तीसाठी विशेष बहुमोलाचे मार्गदर्शन केले. उद्घाटक डॉ. विक्रमजी अव्हाड यांनी विद्यार्थ्यांना आपल्या उज्वल भविष्याकरिता सतत प्रयत्नशिल असावे याकरिता प्रेरित केले. लोहितजी मथानी, पुलिस अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांना नविन पिडीत कसे बदल घडत आहेत याविषयावर प्रकाश टाकला व आपला भारत देश जगात कसा अव्वल करता येईल याविषयाशी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर संस्था प्रमुख डॉ. करंजेकर यांनी शिक्षण प्रणाली ही प्रायोगिक तत्वावर चालविण्याचे आव्हान करुन शुभेच्छा दिल्या. या वार्षिकोत्सवामध्ये हस्तकला प्रदर्शनी, पुष्पगुच्छ सजावट, डिश डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, सामुहीक नृत्य, नक्कल, एकांकीका, गीत गायन, फैंशी ड्रेश स्पर्धा तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आस्वाद देऊन वार्षिकोत्सवाची सांगता करण्यात आली. वार्षिकोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल (सीबीएसई व स्टेट) जमनापूर/साकोली येथील समस्त शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी यांनी बहूमोलाचे सहकार्य केले.