प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत जोगेंद्र कवाडे यांच्या पिरीपा पक्षाच्या युतीची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व होत असताना आमच्याशी विचारविमर्श करणे गरजेचे होते अशी भूमिका त्यांनी मांडली. याविषयी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचेही आठवले म्हणाले. महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात सर्वांनीच भान बाळगणे गरजेचे असल्याचे मतही आठवले यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केले.