ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली शहरातील केदार वाड्या समोर महिला शिक्षिका ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना दि.०८जानेवारी २०२३ ला दुपारी ०४ वा.च्या आसपास घडली.या अपघातात मृत्यू महिला शिक्षिकेचे नाव प्रिया नाहीत (साळवे )वय३५ वर्ष असुन त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा कॉम्प्लेक्स या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
अपघातानंतर पोलिस यंत्रणा घटना स्थळी पोहचले.गंभिर असलेल्या शिक्षिका महिलेस सामान्य रुग्णालयात पोहचविण्यात आले.परंतू प्राथमिक उपचार सुरू असतांनाच प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने नागपूर ला उपचारासाठी नेत असताना वाटेतच शिक्षिका महिलेचा मृत्यू झाला.
सतत रखडले कामे करणारी महामार्ग यंञणा आणि झोपी गेलेला पोलीस वाहतूक विभाग जागा केव्हा होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.