ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन…

      सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावली द्वारा संचालित रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माउंट कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदाताई सुभाष गेडाम, प्रमुख अतिथी ए.जी.गेडाम, प्रेमकिशोर गेडाम, दिगंबर कांबळे, अशोक गडकरी, वेणूताई दुधे, विशाखाताई गेडाम, संस्था सभासद के.एन. बोरकर,चंदभागाबाई गेडाम,डी. बी. गोवर्धन,आर.के. गेडाम, आनंदराव रंगारी श्रीधर सेमस्कार , एच जे.दुधे तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. अभिलाषा गावतूरे चंद्रपूर,नरेन गेडाम सामाजिक कार्यकर्ते सावली, भास्कर मून तथा प्राचार्य एन एल शेंडे प्रभारी प्राचार्य पी जी रामटेके तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

               सर्वप्रथम संस्था अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महाकारुणिक सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर निळ्या ध्वजाचे ध्वजावतरण करून मानवंदना देऊन बुद्ध धम्म संघ वंदना घेण्यात आली.

           कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अभिलाषा गावतूरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणतात की, बाबासाहेब यांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच बाबासाहेबांना अभिप्रेत समाज निर्माण होऊ शकतो.एखाद्या झाडाला पाणी दिले कि जसे त्याची मूळे विस्तारतात त्याप्रमाणे आपण जर पुस्तकाचं वाचन केले तर आपला मेंदू प्रगल्भ बनतो.

           तर नरेन गेडाम यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील महत्व प्रतिपादन करतांना म्हणतात की संविधान म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे ते संविधान देण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले धम्म म्हणजे निसर्ग, समाजात विष बनून पसरलेली विषमता नष्ट करुन,नवा भारत निर्माण करायचा आहे. आपलं जीवन आपल्या हाती आहे ते आपणास घडवायचं आहे समृद्धशाली भारत घडवायचा आहे अशी जबाबदारी विद्यार्थ्यांना सोपवली.

        तर भास्कर मून म्हणतात की,आजचा दिवस संकल्प दिवस म्हणून साजरा केला पाहिजे, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं जीवन होई सपाट असेही म्हणतात,अशोक गडकरी यांनी निर्माण केलेला कविता संग्रह “बाबा” बाबासाहेब यांना समर्पित करतात.

         तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून चंदाताई सुभाष गेडाम म्हणतात की अन्यायाविरुद्ध उगारलेली वज्रमुठ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, “एकदाचा सूर्य अस्ताला जावा,पण बाबासाहेबांचा विचार कधीही अस्ताला जाणार नाही” यासाठी त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे गरजेचे आहे.

           कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणं व श्रद्धांजली गीते झाली तसेच संकल्प दिवस म्हणून स्वयंप्रेरीत वाचन कक्ष व अभ्यासीका कक्षाची निर्मिती करण्यात आली.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.पंडीत फूलझेले व जी.एन. मेश्राम यांनी केले तर आभार सौ.मेटांगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.