भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिनांक ६ डिसेंबर 2023 ला गडचिरोली वनविभाग अंतर्गत उत्तर धानोरा परिक्षेत्रात मानव व हत्ती संघर्ष याबाबत किसान भवन येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व मुरूमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम मुरूमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी अधिनिस्त वनरक्षक व वनपाल हजर होते.
कार्यशाळा किसान भवन धानोरा येथे घेण्यात आले कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रभात दुबे हत्तीतज्ञ छत्तीसगड मकरंद दातार एनजीओ हे होते. कार्यशाळेला कुमारी वैशाली बारेकर सहाय्यक वनरक्षक तेंदू प्रभारी विलास चेन्नुरी संवस परिविक्षाधीन हे हजर होते.
प्रभात दुबे यांनी हत्ती व मानव संघर्ष टाळण्याकरिता काय करता येईल याबाबत मेलाचे मार्गदर्शन केले.हत्ती गावात येणार नाही याकरिता गावाच्या सीमेवर वनाच्या दिशेने स्ट्रीट लाईट लावावे तसेच हत्ती येण्याच्या संभाव्य मार्गावर शेकोटी पेटवून ठेवल्यास हत्ती गावात येणार नाही मिरची पावडर चा धूर दिल्यास हत्ती गावात शिरणार नाही. असे सांगितले तसेच गावात कोणाचे घरी मोहफुले असल्यास त्याच्यावासाने हत्ती गावात शिरतात याकरिता मोह फुले कुणीही घरी साठवून ठेवू नये.याकरिता ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
मोहाचे दारूचा वास आल्यास देखील हत्ती गावात येतात करिता मोहाची दारू सुद्धा बाळगू नये. असे उपाय सुचविले हत्ती मार्गक्रमण करीत असताना हत्तींना हाकलून लावणे मशाल फेकून मारणे त्याच्या मागे धावणे इत्यादी प्रकार टाळावे. असे केल्याने हत्ती चिडून गावात शिरतील व घरांना हानी पोहोचतील परिणामी मानवाला लक्ष करून जीवे सुद्धा मारू शकतात. करिता त्यांना त्यांचे नैसर्गिक जीवनशैलीनुसार जगू द्यावे हत्तींना त्रास दिल्यास मानवाचा पाठलाग करतात तेव्हा आपल्या सोबत असलेला एखादा कापड भांडे एखादी वस्तू फेकावे. असे केल्याने पाठलाग करणारे हत्ती त्या वस्तूवर राग काढतात ज्या वेळात मानवाला दूरवर पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. शेत पीक नुकसान करताना हत्तींना हकलण्याचा प्रयत्न केल्यास हत्तीचा झुंड पसरून शेतीचे अधिक नुकसान करतात.
त्यामुळे त्यांना हाकलू नये हत्तींना लहान पिल्ले असल्यास अधिक आक्रमक होतात तेव्हा जवळ जाणे टाळावे इत्यादी मार्गदर्शन केले.स्पीकरद्वारे हत्तीच्या अस्तित्वाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामस्थ जागरूक होऊन हत्ती व मानव संघर्ष टाळता येतो. सदर कार्यशाळा निलेश दत्त शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यशाळेला कुमारी वैशाली बारेकर सहाय्यक वनसंरक्षक केंद्र प्रभारी विलास चेन्नुरी परिविक्षाधीन वसंत वि मेडेवार वनपरीक्षेत्र अधिकारी उत्तर धानोरा नंदकुमार केळवतकर वनपरि अधिकारी दक्षिण धानोरा विजय कोडापे वनपरी अधिकारी पूर्व मुरूमगाव कु कराडे मॅडम वनपरिअधिकारी पश्चिम मुरूमगाव हे होते सदर कार्यशाळेला पूर्व मुरूमगाव पश्चिम मुरूमगाव उत्तर धानोरा दक्षिण धानोरा परिक्षेत्राचे सर्व वनरक्षक वनपाल असे एकूण 75 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.