रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
वरोरा:- अभिजित कुडे हे सामजिक संघटनेत काम करत असताना समाजकार्याला कुठेतरी राजकारणाची जोड देत,त्यांनी गेल्या दोन वर्षांत आपल्या कार्य,कौशल्य व संघटन बांधनीच्या जोरावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा युवा अध्यक्ष पद मिळविले.
त्यानंतर वेळोवेळी शेतकरी,अपंग,विद्यार्थी,कामगार, रस्ते,सर्व सामान्य माणसाचे प्रश्न आपल्या शांत स्वभावाने व तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लावून धरले.
मग शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडीत झाला त्या बद्दल असो,ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावा,रस्त्याकरीता वेगळे वेगळे आंदोलन,अपंग निधी प्राप्त करून देण्यासाठी आंदोलन असो,निराधार योजना,विविध स्पर्धा आयोजित करणे असो,रक्ताची गरज असो,रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली.
कोरोना काळात गरजूंना धान्य वाटप,घरकुल योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड,अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अभिजित कुडे करीत आहेत.तसेच विद्यार्थ्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करीत आहेत.
सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते,विशेष शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी अभिजित कुडे प्रयत्न करीत असतात.
यश-अपयश पदरी पडले तरी प्रामाणिक हेतूने समाजहिताचे कार्य सूरू आहे.शिवाय अभिजित यांचे शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे व त्यांचा ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे.
सध्याचे राजकीय वातावरण बघता या तरुण चेहऱ्याला कितपत पसंदी मिळतेहे बघणे अधिक सार्थ ठरणार आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता त्यांच्याकडे एक युवा,निष्कलंक व तडफदार नेतृत्व म्हणुन बघितले जात आहे.
अभिजित ग्रामीण भागातंर्गत शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे.त्यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना विधानसभा युवा अध्यक्ष पद देण्यात आले.
दिग्गज नेत्यांच्या विरोधात एक तरुण असे चित्र या भागात तयार झाले आहे.अनेक वर्षापासून सुरू असलेली घराणेशाही व सदर भागाचा रखडलेला विकास करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला अस ते सांगत आहेत.
या भागातील प्रश्नांना घेऊन अभिजितनी अनेक आंदोलन केले,केसेस दाखल झाल्या,एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी धडपड करीत असतो. लोकांनी साथ दिली तर नक्कीच या भागाचा कायापालट होणार असे अभिजित कुडे नेहमी सांगत असतात.
ज्यांनी कधी ऐकलें नाही, कधी लोकांचे प्रश्न सोडविले नाही, फक्तं पैश्याच्या जोरावर निवडणुकीत उतरणार आहेत,त्यांना अभिजितच्या उमेदवारी मुळे जबर धक्का बसला आहे.
अतिशय कमी काळातच अभिजीतने ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत अभिजीतचे नाव चर्चेचा विषय ठरला आहे.अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.मात्र सर्वसामान्य माणसांची इच्छा आहे की अभिजित ने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी.
२३ वर्षीय अभिजित कुडे हे जिल्हा परिषद निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत.जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून युवा पिढीत बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे.
तसेच माढेळी- नागरी जिल्हा परिषद मधून अभिजित कुडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्तमान जिल्हा परिषद सदस्य समस्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरले असल्याची लोकचर्चा आहे.अभिजित कुडे उखर्डा येथे राहत असून सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहेत..तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात स्वतःचे अस्तित्व त्यांनी सिद्ध केले आहे.
लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.सर्व सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहे.न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.युवकांना एकत्र आणून त्यांना दिशा देण्याचे काम करत आहेत.माढेळी रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत आहेत.14 निवेदन 7 आंदोलन करून त्यांनी रस्त्याची डागडुजी करून घेतली व रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष अजून सुरूच आहे.त्यांच्या आंदोलनाला व संघर्षाला यश मिळाले असून रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी धडपड सुरू आहे.शेतकऱ्यांचे कोणतेही काम असो त्यासाठी अभिजित कोणत्याही परिस्थितीत त्यांचे काम करून देतो.कित्येक शेतकऱ्यांचे थकलेले हप्ते,विहिरीचे पैसे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा व पाठपुरावा करून काढून दिले.अधिकारी रास्त मार्गाने ऐकले नाही तर आंदोलनाचा इशारा देत मागण्या पूर्ण केल्या.अपंगाच्या निधी असो-त्यांचे प्रश्न असो,निराधार लोकांचा आधार अभिजित झाला आहे.
परिसरातीलच नाही तर तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत.राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य कसे करता येणार या साठी ते प्रयत्नशील असतात.लोकांची सेवा करणे हाच हेतू घेऊन राजकारणात प्रवेश केला असे त्यांनी सांगितले.
लॉक डाऊन मध्ये मजुरांना अन्य धान्य किट वाटप केले.मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील वर्ग 1 ते 8 च्या 70 विद्यार्थांसाठी निःशुल्क वर्ग सुरू केले.त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
My village my mision अंतर्गत वृक्ष लागवड व गावाचा सर्वांगीण विकास आराखडा घेऊन ते काम करत आहेत.कोणताही व्यक्ती त्यांच्या कडे आशेचा किरण म्हणून बघत आहे.नेहमी लोकांच्या प्रश्नांना घेऊन ते काम करत आहेत.लोकांच्या मनात त्यांची वेगळी छाप पडली आहे.सर्व सामान्य माणसाला,शेतकरी, अपंग व्यक्ती,निराधार यांचा अभिजित कुडेला पाठिंबा आहे.
युवकांनी अभिजितचे नेतृत्व डोक्यावर घेतले आहे.अनेक युवक त्यांच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत.आगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलन करुन ते लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जातात.अधिकाऱ्यांवर त्यांची वचक आहे.कारण ते अभ्यासू,कार्यश्रम व्यक्तिमत्त्व आहेत.संपूर्ण विधानसभेत युवकांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे.अभिजितने निवडणुक मैदानात उतरावे अशी सर्व सामान्य माणसाची भावना आहे.
कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून,जबाबदारी स्विकारून लोकांना योग्य दिशा दाखवून,सोबत घेवून प्रगती करणे होय.याच हेतूने ते लोकांसाठी काम करतात व त्यांच्यात वैचारिक सुधारणा करतात.सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील सर्व सामान्य माणसासाठी अभिजित जीवाचे रान करून घेतो.
उखर्डा ते नागरी रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष सर्वानी बघितले आहे.रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम बघून तो ठेकेदार व अधिकाऱ्यांसी बेधडक भिडला43 आंदोलन करून अनेक रस्त्याचे काम मंजूर करून घेतले आहे.सर्व सामान्य माणसाला त्याच्यात एक हक्काचा माणूस दिसतो.समस्या कोणताही असो लोक अभिजित कडे येतात.युवकांनी त्याचे नेतृत्व डोक्यावर घेतले आहे.
प्रत्येक गावातील 15,20 युवकांचा त्याला पाठींबा आहे.पुरुष सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.महिला वर्गातून चांगला प्रतिसाद आहे.अभिजीत परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अभिनव संकल्पना आणि जिद्द-चिकाटी-मेहनत व प्रामाणिक प्रयत्न हे त्यांचे गमक आहे.
त्याचा जनसंपर्क बघून प्रस्थापित पुढाऱ्यांना आतापासून घाम फुटला आहे.एक तरुण सर्व,सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा त्यामुळे अभिजितला लोकांची पसंती दिली आहे.