चिमूरात ओबीसीचे अन्नत्याग आंदोलन…

 

अरमान बारसागडे

तालुका प्रतिनिधी चिमूर

चिमूर – मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीला घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तहसील कार्यालयासमोर दि. ७/१२/२०२३ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अक्षय लांजेवार आणि अजित सुकरे बसलेले आहेत.

          मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, महाराष्ट्रातही जतनिहाय सर्वेक्षण करावे, मेगा नोकरभरती सुरू करावी, ओबीसी, विजा, भज, विशेष मागास प्रवर्ग समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष भरावा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावी, आधार योजना लागू करण्यात यावी, प्रत्येक शहरात व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सुविधा करावी.

        ओबीसी सवर्गातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमा करीता शिष्यवृत्ती, फ्रिशिप योजनेत समाविष्ट करावे यासह अनेक मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले, याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर,महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश पाटील चोखारे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश वारजुरकर, श्याम लेढे, धनराज मुंगले, गजानन बुटके, राजू लोणारे, कवडू लोहकरे , रामदास कामडी, दिनेश कष्टी, अशोक वैद्य, मारोतराव अतकरे, राजू दांडेकर यांची उपस्थिती होती.