पलसगड येथे पुन्हा रानटी हत्तीचे आगमन..   — हत्तींचा धुमाकूळ,धान पिकांसह ट्रॅक्टरचे केले नुकसान.

     सुरज मेश्राम

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

           कुरखेडा तालुका मुख्यालयापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या पलसगड येथील शेतसिवारात धुमाकूळ घालून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे नुकसान केले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

             शेतकरी कलीरामजी दर्रो यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास अंदाजे २० ते २५ च्या संखेत असलेल्या रानटी हत्तीच्या कडपांनी शेतात प्रवेश करुन, शेतकरी कलीराम दर्रो,रवींद्र कोडाप,डाकराम कसारे,यांच्या धान पिकांची नुकसान केली.

               शेतात ठेवलेल्या उभ्या ट्रॅक्टरचेही हत्तींने नुकसान केले आहे.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी.कुंभलकर,क्षेत्र सहाय्यक के.के.काशीवार,चौकीदार मधुकर दरवडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.

              मागिल दोन वर्षापासुन हत्तींचा कळप सामुहिक रित्या धान आणि इतर साहित्यांचे नुकसान करीत असल्याने नागरिकामध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.