प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्ताने आज,”चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथे भावपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तेली समाजबांधवांची एकसंघता व भव्य शोभायात्रेचे लक्षवेधक नियोजन होय.
अप्पर तालुका व नगरपंचायतचे ठिकाण असलेल्या मौजा भिसीच्या मुख्य मार्गांनी श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची काढण्यात आलेली शोभायात्रा,क्षणोक्षणी मन प्रसंन्न करणारी होती.
लेझीमचा ताल, ढोलटाळांचा गजर,बॅंजोचा मधूर सुर,डिजेचा एकसंघ निनाद,भजनांची संगीतमय लय आणि घोषवाक्यांचा भावार्थ,तद्वतच श्री.संत संतांजी जगनाडे महाराज यांच्या सुंदर प्रतिमांची झाकी,मौजा भिसी येथील नागरिकांना मनःपूर्वक प्रसंन्न करीत होती व स्वाभिमानाचा आणि स्वावलंबनाचा माहांत्तम संदेश देत होती.
भिसी येथील श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शोभायात्रेंनी तर अख्खा महाराष्ट्र राज्यात व देशभरात प्रसिद्ध असलेल्या संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्याप्रती विनंम्रभावार्थ व्यक्त करण्यासाठी दरवर्षी काढण्यात येणाऱ्या पंढरपूर पैदल पालखी सोहळ्याची आठवण करून दिली.
महाराष्ट्र राज्यातंर्गत निघणाऱ्या संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांत अपार शांतीभाव व सखोल मैत्रीभाव असतो.त्याच पध्दतीचा अपार शांतीभाव व मैत्रीभाव भिसी येथील श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शोभायात्रेतंर्गत तेली समाज बांधवांत,भगिनींत,युवकांत,युवतीत,लहान मुलात व इतर नागरिकांत होता.
भिसी येथील श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शोभायात्रातंर्गत पार पडलेला,” जयंती सोहळा,हा अस्मरणीय असाच होता..
भिसी येथील तेली समाज बांधवांनी,”स्वतःच्या तनमनधन बलावर,”काढलेली शोभायात्रा,”एकप्रकारे अमुल्य ठेवा आहे,हे श्री.संत संताजी जगनाडे महाराज सुध्दा म्हणत असतील असा भास होतो आहे.
समाज जागरूक व एकसंघ करण्यासाठी, सामाजिक बांधिलकी अंतर्गत ऋणानुबंध जपण्याची वैचारिक ताकद व मनमोकळी सद्भावना असली की सर्व शक्य असते हे आज भिसी येथील तेली समाज बांधवांनी,”श्री.संत संताजी जगनाडे महाराज,यांच्या जयंती दिनानिमित्ताने दाखवून दिले हे विशेष….