उमेश कांबळे ता प्र भद्रावती –
स्वर्गीय सेन्साई प्रकाश कोवे व स्वर्गीय मुन्ना शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ ओकिनावा मार्शल आर्ट भद्रावती तर्फ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ९ डिसेंबरला हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे स्वर्गीय सेन्साई कोवे व मुन्ना शर्मा यांनी आपल्या अंगी असलेले क्रीडा गुण अनेक विद्यार्थ्यांच्या स्वाधीन केले व विद्यार्थ्यांना घडवले त्यामुळे ते विविध क्षेत्रात आज मोठमोठ्या पदावर कार्य करीत आहे.या दोन्ही गुरूंची आठवण म्हणून दरवर्षी भद्रावती शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने रक्त दात्यानी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी पवन हुरकट , डॉ कार्तिक शिंदे, राजू गैंनवार, विनोद वानखेडे, विलास दाते, रत्नाकर साठे, अनिल मोडक आदी उपस्थित होते.