कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :-
काल नावे परत घेतल्या नंतर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकारिता ६८ उमेदवार तर १७७ ग्रामपंचायत सदस्य पदाकारीता ४३१ उम्मेदवार रिगणात शिल्लक राहिले आहेत.यंदाच्या ग्रा.प. निवडणुकी अंतर्गत महिलांमध्ये जास्त उत्साह दिसून येत आहे.
महीला सरपंच पदासाठी ४४ महीला उम्मेदवार रिगणांत तर ग्राम पचायत सदस्या करिता २२३ महीला रिगणांत आहेत.
७ दिसंबरला नामांकन अर्ज मागे घेण्यामध्ये सरपंच पदा मधुन ७ अर्ज मागे घेतले तर ग्राम पंचायत सदस्यमध्ये २८ उम्मेदवारानी आपले अर्ज मागे घेतले.
निवडणुक चिन्ह वाटपा करिता आज बुधवारी दिवशी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी सकाळपासून निवडणुक चिन्ह मिळे पर्यंत तहसील आवारात गर्दी केली होती.
दुसरीकडे जनतेतून थेट सरपंच निवडीमुळे सरपंच पदासाठी ६८ उमेदवारांची उत्सुकताही अधिक दिसून आली.18 डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी शेवटच्या टप्प्यात राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत.पारशिवनी तालुक्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी गावोगाव फिरताना दिसत आहेत.
सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. 21 सरपंच व 177 सदस्यांच्या निवडणुकीसाठी २१ हजार ९९२ पुरुष मतदार तर १९ हजार ३४६ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
एकूण २१ ग्राम पचायत सरपच पदाकरिता ६८ तर एकुण ६७ प्रभागांसाठी 177 ग्राम पंचायत सदस्या ४३१ उम्मेदवार रिंगणात असल्याची माहीती तालुका निवडणुक अधिकारी व तहसिलदार प्रशांत सागळे यांनी दिली.