महिलांना मिळणार दरमहा ३ हजार रुपये तर युवकांना मिळणार दरमहा ४ हजार रुपये.. — देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी,राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांची घोषणा..‌‌

          राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा…

      महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराने जोर धरल्याने महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी सार्वजनिक घोषणा करून महालक्ष्मी योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा ३ हजार रुपये तर बेरोजगार युवकांना ४ हजार रुपये दरमहा देण्याची घोषणा केली.

          या पंचसूत्री घोषणा वेळी भारत देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार,शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे आणि इतर पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

         सदर पंचसूत्री घोषणा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना,महिलांना,युवकांना,आजारग्रस्तांना,विद्यार्थ्यांना उभारणी देण्याचे काम करणारी आहे.

पंचसूत्री घोषणा खालील प्रमाणे…

1. महालक्ष्मी सहयोग योजना..

 महिलांना दर महिन्याला ₹ ३,०००

 महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास

2. कुटुंब आरोग्य रक्षण योजना..

 ₹.२५ लाखांपर्यंतचा

 आरोग्य विमा मोफत औषधे.

3. समानतेची हमी योजना…

 जातीनिहाय जनगणना करणार

 ५०% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील

4. कृषी समृद्धी योजना..

शेतकऱ्यांना ₹३ लाखांपर्यंत कर्ज माफी 

 नियमित कर्जफेडीसाठी. ₹५०,००० प्रोत्साहन

5. युवकांना सहयोग योजना..

 बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ₹.४,००० पर्यंत मदत

विचार जनतेचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा
शब्द विश्वासाचा – महाविकास आघाडीचा 
लोकसेवेची – पंचसुत्री