महाराष्ट्रीयन मतदारांनो 20 नोव्हेंबरला मतदान करताना, हे लक्षात ठेवा…. — भाग ५…..

       लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……

      तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया असते…..

       महाविद्यालयीन युवक /युवतीनो प्रथम आपण जागतिक व्यवस्थेने लादलेल्या संमोहित मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यातून काही वेळासाठी ( अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी ) बाहेर या…..

      तुम्ही तुमच्याच हृदयाला प्रश्न विचारा की,तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी सोडा..

        परंतू ,तुम्ही स्वतः वैचारिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या अडचणी येतात?

      तुमच्या या अडचणी सोडविण्यासाठी सरकारची भूमिका कोणती असते?

        ही व्यवस्था मोबाईल आणि इंटरनेटच्या संमोहित जाळ्यात फसवून तुम्ही संविधानातील मूलभूत हक्कातून जागृत होऊच नये यासाठी ही व्यवस्था व्यवस्थित काम करते आहे. याची जाणीव सुद्धा तुम्हाला होऊ नये म्हणून हे सत्ताधारी राजकीय पक्ष खोटे आमिष देऊन तुमची मती गुंग करुन तुम्हाला मतिमंद करण्याची व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलेली आहे..

      एकच उदाहरण सांगतो की, “जेंव्हा तुम्ही MPSC /UPSC च्या तयारीसाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अगदी वयोमर्यादा संपेपर्यंत खपता.”

          आणि इकडे मोदी – शहा लोकसभा अध्यक्ष असलेल्या ओम बिर्लाच्या मुलीला डायरेक्ट IAS पदी विराजमान करतात.तिथे ना,लेखी तोंडी टेस्ट,मुलाखत,सर्वकाही आलबेल!

असं का….?

  असा कधी तुम्ही स्वतःला प्रश्न कधी विचारला का …?

    किंवा तुमच्या मित्र /मैत्रिणीच्या वर्तुळात कधी चर्चा केली….?

    तुम्ही असे व्यवस्थेला प्रश्न कधी विचारूच नये…

      म्हणूनच तर तुम्ही या मोबाईल आणि इंटरनेटच्या संमोहातून मान वर काढूच नये यासाठी सर्व व्यवस्था त्यानी कामाला लावलेली आहे!

ही आहे RSS/ भाजपची नीती!

     तुम्ही अभिमन्यू सारखे घेरल्या गेले आहात.तुम्हाला बाहेर पाडण्यासाठी संविधान समजून घेऊन आपल्या मूलभूत हक्कासाठी जागृत होणे आणि त्या हक्कासाठी …..

बांगलादेशच्या विद्यार्थ्यांप्रमाणे रस्त्यावर उतरणे…

     वरीलप्रकारचे केवळ एकच उदाहरण मी या ठिकाणी घेतले आहे.अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

       मग मला सांगा तुमचे आईवडील काळजाचे पाणि करुन,कर्जबाजारी होऊन तुमच्या शिक्षणासाठी अहोरात्र संघर्ष करत असतांना,तुम्ही मात्र या व्यवस्थेचे बटीक होऊन या साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीच्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम होणार का?

      तुम्हीच उद्याचा भावी देश घडवणार आहात असे गेल्या 70 वर्षांपासून आम्ही ऐकत आलोय..

परंतू ,तो उद्या अजूनही उगवला नाही!

   तर मग हे असं किती वर्षे चालवायचं?

     हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. याचे उत्तर तुम्हीच स्वतः शोधा आणि त्या जागृतीच्या माध्यमातून तयार व्हा…

    माझ्यासारखी अनेक वैचारिक फलटण मी तुमच्यापाठीमागे खडकाप्रमाणे उभी करेन..

कारण हा देश तुमचा आहे……

 हे राज्य तुमचे आहे…….

    तुम्हीच या देशाचे / राज्याचे मालक आहात.तर मग हे राजकारणी नेते, राजकीय पक्ष, सत्ताधारी किस झाड की पत्ती?

       परंतू ,त्यासाठी तुम्हाला मात्र एकसंघ होऊन संविधान समजून घेऊन संघटीतपणे रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागेल…

        त्या आंदोलनाची प्रथम सुरुवात ही महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना खाली खेचणे…..

            त्यानंतर 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, आमचा मूलभूत हक्क हिरावून घेणाऱ्या EVM ला पॅसीफिक महासागरात बुडवणे.सोबतच व्यवस्थेला प्रश्न आणि जाब विचारून आम्ही तुमचे गुलाम नसून एक जबाबदार नागरिक आणि सुशिक्षित युवक या देशाचे मालक आहोत.हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे…

       असे जर तुम्ही करत नसाल तर तुमचे मुंडके त्या मोबाईल आणि इंटरनेटच्या संमोहात खुपसून या व्यवस्थेचे गुलाम बना…..

       जेंव्हा तुमची लेकरं तुमच्या सुशिक्षितपणाचा जाब विचारतील तेंव्हा त्यांच्यापुढे निरुत्तर व्हाल.

      हे जर टाळायचे असेल,या गुलामीतून बाहेर पडायचे असेल,तर प्रथम या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे काम करा…..

     यानंतर एकेक स्टेप घेऊन पुढची वाटचाल करू….

   तुमच्याच हातात सर्वकाही आहे…

     कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे,की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल…

असा निर्धार करुनच मतदान करा….

*****

विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान जागृतीसाठी दररोज येणाऱ्या सर्व पोस्ट आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सप गृपआणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात..

*****

आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..