
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : गुजरातचे संत श्री जलाराम बाप्पा यांची २२५वी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. जलाराम सत्संग मंडळाचे अध्यक्ष धीरूभाई राजा व विश्वस्तांच्या उपस्थितीत जलाराम बाप्पांची विधीवत पुजा करण्यात आली. श्री जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची तसेच जलाराम सत्संग मंडळाचे मा.अध्यक्ष स्व.मगनभाई राजा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदीत काढण्यात आली. श्री.जलाराम बाप्पाच्या मिरवणुकीत ठिकठिकाणी जलाराम बाप्पांच्या प्रतिमेला हार घालून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सुरेश वडगावकर, अशोक उमरगेकर, रामदास भोसले, अजित वडगावकर, संजय घुंडरे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, पोपट वडगावकर, मदनलाल बोरुंदिया, संतोष चोरडिया, विलास वाघमारे हे उपस्थित सहभागी होते.
जलाराम सत्संग मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जलाराम जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.