कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी :-पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील एक गाव दत्तक घेऊन गावातील सर्व कुटुंबाला साडी चोळी व भेटवस्तू , मिठाई, ताट,वाटी व ईतर साहित्य देऊन दिवाळी साजरी करण्याकरिता आकाशझेप फाऊंडेशन व वनविभागाचा संयुक्त उपक्रम शुक्रवार दि १० नोव्हेंबर २०२३ ला आदिवासी क्षेत्रातील शिलादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला उपविभागिय अधिकारी वदना सवरंगपते तहसिलदार भंडारकर, राजेंद्र मुळक माजी मंत्री. व अध्यक्ष जिल्हा काँग्रेस.
चंद्रपालजी चौकसे पर्यटन मित्र तथा संस्थापक रामधाम, अध्यक्ष सरपंच संघटन,व दुधराम सव्वालाखे जिल्हा परिषद सदस्य,विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख उध्दव ठाकरे गट,राजुभाऊ कुसुंबे शिक्षण सभापती जिल्हा परिषद नागपूर सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी ,उपसभापती करूणाताई भोवते,सौ.अर्चनाताई दिपक भोयर जिल्हा परिषद सदस्या, बबनराव झाडे कांग्रेस महासचिव सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती डॉ. प्रमोद भड. दिपक पालीवाल अध्यक्ष पोलीस पाटील संघटना. डॉ. इरफान अहमद शेख. व शासकीय प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदर साडी चोळी व भेटवस्तू,धोतर,पातळ,पॅटपिस, मिठाई,ताट,टाॅवेल व इतर साहित्य वितरण सोहळा पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील प्रत्येक वर्षी एका गावाची निवड करूण त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला दिवाळी भेट घेऊन दिवाळी साजरी करण्याची संकल्पना तत्कालीन गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांनी अमलात आणली. २०१६ पासून सदर सामाजिक उपक्रम गेल्या ९ वर्षे पासून अखंडित सुरू आहे.
या वर्षी आकाशझेप फाऊंडेशन व वनविभागाच्या व सामाजिक दायित्व स्विकारणार्या लोकांच्या मदतीने साजरा करण्यात येतो.
आकाशझेप फाऊंडेशन चे अध्यक्ष अरविंद दुनेदार. सचिव साक्षोधन कडबे व आकाशझेप फाऊंडेशन सदस्य. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण व वन परिक्षेत्र अधिकारि प्रवीण लेले. पंचायत समिती पारशिवनी गट विकास अधिकारी सुभाष जाधव व ग्रामसेवक संघटना उपस्थित राहणार आहेत.
पारशिवनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी. पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे. तहसीलदार. आदी लोकसेवक कार्यक्रमातुन योजना. धोरण. माहिती उपस्थित ग्रामस्थांना देणार.
हा एक सामाजिक उपक्रम असून कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी करण्यासाठी गौरव पनवेलकर. धनराज मडावी गुरुजी अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी. विजय सेगावकर. गोपाल कडू . दिवाकर भोयर. राजेश कडू माजी सभापती पंचायत समिती पारशिवनी. राहुल मेंघर. मंगेश खापेकर सामाजिक कार्यकर्ते. मोहन लोहकरे. रंजित गजभिये. राजेश गोमकाळे. पंकज कडू. रोषन पिंपरामुळे. प्रेम भोंडकर. आदी सहकार्य व परिश्रम घेत आहेत.