सावली (सुधाकर दुधे)

तालुक्यातील वेगवेगळ्या गावात मागील चार दिवसात विनयभंग आणि बलात्काराच्या तीन घटना घडल्याने सावली तालुक्यात एकच खळबळ माजली आहे 

      हिरापूर येथील ५०वर्षीय धनराज पतरु गोहणे या नाराधमाने एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अंतवस्त्रात हात घालून विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केल्याने त्यांच्यावर भांदवी ३५४व पोकसोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली .

        व्याहड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर( १९)या आरोपीने दुसऱ्या गावातील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले मात्र लग्नास नकार दिल्याने 

 

 पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ अन्वये तथा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे . आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे . 

       सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम या २५ वर्षीय युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले . त्यात ती गर्भवती झाली . लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले . पुढील तपास भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहेत .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com