नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : साकोली तालुका शिवसेना कडून नुकतेच शहरातील मुख्य चौक ठिकाणी शिवसेना फलकांचे अनावरण सोहळा निलेश धुमाळ शिवसेना भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख, सहसंपर्कप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा समन्वय प्रमूख उपजिल्हाप्रमुख किशोर चन्ने, तालुका प्रमुख प्रमोद मेश्राम, युवासेना संपर्क प्रमुख भंडारा विक्रम राठोड, उपजिल्हा संघटीका प्रतिभा पारधी, सुनिता भैसारे तालुका संघटिका, तालुका सचिव रितेश उके, उपतालुका प्रमुख जिंतेंद्र उईके, कृष्णा कापगते, विलास मेश्राम, तालुका अध्यक्ष महेश पोगडे म.वा.से, शहर अध्यक्ष गजेंद्र लाडे, अनिल डोमळे, युवासेना प्रमुख आकाश मेश्राम व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्राम गृहात बैठकीला संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी साकोली तालुक्यातील शिवसैनिक व कार्यकर्ते यांच्याशी वार्तालाप करीत घर तेथे शिवसैनिक, गावं तेथे शिवसेना शाखा स्थापन करून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आधारस्तंभांतून शिवसेना पक्षाला अखंड व बळकट करण्यासाठी आवाहन त्यांनी यावेळी करीत मोलाचे मार्गदर्शन केले.