कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक तीन निरंजन परिसरात सुरु असलेल्या

कोंबडी च्या जुगार अड्यावर कन्हान पोलीसांची धाड मारली असता पोलीसांनी दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन दोन कोंबडे आणि नगदी रुपय सह एकुण १९७० रु मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दि. ६ नोव्हेंबर ला दुपारी ३ ते ३:३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस आपल्या हद्दी मध्ये पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि कांद्री वार्ड क्रमांक तीन परिसर येथे कोंबड्या चा जुगार सुरु आहे . अश्या विश्वसनीय माहिती वरुन कन्हान पोलीसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता तिथे अवैध रित्या दोन कोंबड्याचा पायाला लोखंडी काथी लावुन झुंज लढवत कोंबड्यावर पैसे लावुन हार जीत चा जुगार खेळतांनी मिळुन आल्याने पोलीसांनी आरोपी १) जयराम भिमराव गायकवाड रा. सत्रापुर कन्हान २) प्रमोद रमेश हरेद रा.कांद्री कन्हान या दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन नगदी ९७० रु, एक काळ्या लाल रंगाचा कोंबडा ५०० रु , व एक लाल पांढऱ्या रंगाचा कोंबडा ५०० रु असा एकुण १९७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन सरकार तर्फे फिर्यादी पोलीस शिपाई सुशिल मोरेश्वर तट्टे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध कलम १२ , महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पो.ना प्रशांत रंगारी हे करीत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com