युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडीने दर्यापूर विधानसभा लढविन्यासाठी मला उमेदवारी द्यावी. याकरीता वंचित चे माजी तालुकाध्यक्ष भिमराव कुऱ्हाडे यांनी दर्यापूर येथे पत्रकार परिषद घेत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मी पक्षाकडे उमेदवारी फॉर्म भरला असून मला पक्षाने उमेदवारी दिली तर माझा विजय कोणताच पक्ष रोखू शकत नाही.
मी पिंपळोद जिल्हा परिषद निवडणूकीत २०१७ साली निवडणूक लढवीली असून मी २०१८ ते २०२० मध्ये भारीप बहुजन आघाडी दर्यापूर तालूका अध्यक्ष होतो. २००९ पासून तर आजपर्यंत भ्रष्टाचारा विरोधात अनेक आंदोलने करुन शासन प्रशासनाला वेठीस धरले,राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला.
२०२१ ला माझी पत्नी सौ.पंचशीला भिमराव कुऱ्हाडे ही ओपन महिला मधून सरपंच पदावर विराजमान झाली. तसेच गावच्या विकासाकरीता दलीत वस्तीमधील ११ घरांना भुउत्खननाच धोका असल्याने जिवाची पर्वा न करता जलसमाधी आंदोलन असो आत्मदहना चा प्रयत्न असो शेवटी विष प्राशन आंदोलन केल्याने चार दिवस मृत्युशी झुंज देऊन जिल्हा नियोजन विभाग अमरावती (डी पी टी सी) मधून दोन कोटी एकोणवीस लाख मंजूर करुण पुर संरक्षण भिंतीचे काम पुर्ण झाले.
स्वतः वाळू उत्खनन चोरीचे कित्येक प्रकरने उघडकीस आणून शासन प्रशासनाला लाखो रुपये कमावून दिले. वेळप्रसंगी माझ्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न पण काही माथेफिरूने केले.
दर्यापूर दहीहांडा नवीन डांबरी रोड अंजनगाव ते दर्यापूर सारखा व्हावा म्हणून दोन वर्षा पासून सतत पाठपुरावा करीत आहोत.
तसेच लोतवाडा ते कुटासा शेतीचा हा पांधन रस्ता तात्काळ व्हावा म्हणून लोकप्रतीनीधी आमदार बळवंत वानखडे यांचे कडे मागणी केली परंतू भाऊ आता खासदार असून सुद्धा आमचा शेत रस्ता होत नाही कीवा दहीहंडा दर्यापूर रोड मंजूर होत नाही,ही शोकांकिका आहे.म्हैसपूर ते अडूळा ते सासन या रोडमध्ये भ्रस्टाचार झाला तेव्हा मी सासन फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करुण प्रशासनाला धारेवर धरले. या सर्व बाबीचा विचार करून मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी देण्यात यावी.
तसेच मला पक्षाने उमेदवारी दिली नाही,तरी मी पक्षासोबत इमानदारीने काम करेल,कारण वंचिताचा नेता फक्त ॲड बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत.बाळासाहेबांचा पक्ष कमजोर करण्याकरीता कॉग्रेस पक्षाने राजरत्न सपकाळ यांना राजकारणात आणले असावे असा माझा आरोप आहे.
तरी यावेळी खऱ्या बहुजनांनी ॲड बाळासाहेब यांचे हात मजबुत करून वंचित बहुजन आघाडी ला मतदान करावे.या पत्रकार परिषेदेला हींमत गवई ,कैलास धांडे ,आकाश गावंडे ,लोतवाडा तसेच गोपाल चौरपगार, संदीप चौरपगार,अजय चौरपगार ‘ बाबुराव चौरपगार , संकेत चौरपगार ,जय चौरपगार ,शुभम चौरपगार ‘ भिमराव चौरपगार , उमेश चौरपगार तसेच असंख्य कार्यकर्ते हजर होते.