26 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 2024… — 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2025.. — संविधान दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत…..! — त्या निमित्ताने संविधान जागृतीचे महान कार्य हाती घेऊया….. — भाग —1

26 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 2024 आणि 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2025..

वरील…….

— संविधान दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत…..!

— त्या निमित्ताने संविधान जागृतीचे महान कार्य हाती घेऊया…..

— भाग —1

     “संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य,अधिकार आणि त्याचबरोबर कर्तव्य सुद्धा सांगितलेत (मी तर कर्तव्यातून सिद्ध होणार त्याची तयारी चालू आहे ) ….

    EVM मुळेच देशातील लोकशाही संपत आहे…..

      त्याला जबाबदार मीच ( जनता )……

       कारण या देशाची लोकशाही संविधानाच्या जागृतीवर आधारलेली आहे. आणि संविधानाची तोंडओळख ही तीच्या उद्देशीकेत आहे.तीच उद्देशीका भारताच्या नागरिकांस आवाहन करते….

   “आम्ही भारताचे लोक,या ओळीपासून…..

स्वतःप्रत अर्पण करत आहोत. 

या ओळीने संपते….

         याचा अर्थ स्पष्ट आहे की, कर्तव्यात मी आणि हक्कात आम्हीची भावना निर्माण करण्यास आम्हाला ही उद्देशीका भाग पाडते.अर्थात,हे संविधान जागृतीतून अविष्कार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देते.

          म्हणजेच थोडक्यात सारांश हाच की “संविधान जागृती हीच देशाची प्रगती “हे समीकरण आमच्या पूर्वजांनी आमच्या भल्यासाठी ( भारतीय जनतेसाठीच ) करुन ठेवलेले आहे.यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांचा किंवा नेत्यांचा यामध्ये समावेश नाही!

         म्हणून गेल्या 75 वर्षात आम्ही संविधानातून जागृत होऊ नये यासाठी येथील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आणि प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांनी या सर्वांनी मिळून आम्हाला संविधानातून जागृत होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत,करत आहेत आणि करणार आहेत.संविधानाचा विषय KG TO PG अभ्यासक्रमात न घेण्याचे हेच कारण आहे.

        जर KG to PG च्या अभ्यासक्रमात संविधानाचा विषय अगदी गहन पद्धतीने ठेवला असता,तर कदाचित आज आमचा देश धर्मांध न बनता डोळस होऊन कर्तव्यातून विज्ञानवादी,विवेकवादी जागृत बनला असता..

         आणि इंग्लंड,अमेरिका यांच्याही पुढे लोकशाहीप्रधान देश म्हणून क्रमांक एकचा राहिला असता.

           आज 2024 मधला भारत देश एका डेंजर झोन मध्ये जाण्याच्या वळणावर येऊन थांबलेला आहे.त्याची कारणे आणि उदाहरण असंख्य आहेत.परंतू ,त्यातील एक उदाहरण खूप महत्वाचे आहे.ते पुढीलप्रमाणे आहे.

        “डरने की कोई बात नही, हमारेपास सारी व्यवस्थाए है. हमने सारा इंतेजाम करके रखा है! जब 8 आक्टोबर को EVM खुलेगी तब काँग्रेस रोएगी और कहेगी की,EVM ने इनको जिताया है!

— मुख्यमंत्री हरियाणा ( नायबसिंग सैनी )

वरील वक्तव्य त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष,भाजपाचे राज्य प्रवक्ता यांच्या उपस्थितीत वरील वक्तव्य केलेले आहे!

वरील वक्तव्याचा अर्थ काय?

या वक्तव्याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या…

    माझ्या आकलन क्षमते प्रमाणे अर्थ काय असेल तो मी उद्याच्या पोस्ट मध्ये असेल…..

           जागृतीचा लेखक

             अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689..