राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा..
गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा सोनसरी येथील दहिकर कृषी केंद्र येथे शेतकऱ्यांना,”आगामी हंगाम व खतांचा योग्य वापर,या संबंधाने चेतन उमाटे गडचिरोली यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना नॅनो खतांचा वापर आणि फायद्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले,तसेच आगामी हंगामासाठी WSF,सागरिका आणि इफकोच्या जैव खतांविषयी मार्गदर्शन केले.
तद्वतच केंद्रित पिके,उन्हाळी भात आणि मका याचे उत्पन्न घेण्यासंबंधाने चेतन उमाटे यांनी आवश्यक माहिती दिली.