प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील बस स्थानक जवळ रहिवासी असलेल्या सुशीला सेवानंद सहारे (वय ५४ वर्षे) यांचे कर्करोग (कॅन्सर) या रोगाने दि. ०८ ओवटो. रोजी सकाळी ०८ च्या दरम्यान राहत्या घरीच निधन झाले. त्यांचेवर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशीला सेवानंद सहारे हे वैरागड येथील माजी सरपंच सेवानंद रघुजी सहारे यांच्या पत्नी होत्या.
सन – २००४ पासून स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. आज सकाळी त्यांच्यावर काळाने आघात केला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचेवर येथील मानापुर रोड वरील वैलोचाना नदीवर संध्याकाळी ०५:३० वाजता अग्नी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, नातू तसेच सहारे मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार वेळी गावातील आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.