प्रितम जनबंधु

संपादक

 

उपविभाग धानोरा अंतर्गत येणार्‍या सावरगाव पोलिस मदत केंद्राच्या परिसरात नक्षलविरोधी (Naxalites) अभियान राबवित असताना 2 जहाल नक्षल्यांना अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज घेण्यात अलेल्या पत्रपरिषदेतून दिली.

 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सनिराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा शामराव नरोटे (24), समुराम उर्फ सुर्या घसेन नरोटे (22) दोघेही रा. मोरचूल ता. धानोरा यांचा समावेश आहे.

 

सनिराम नरोटे हा ऑक्टोबर 2015 मध्ये टिपागड दलममध्ये भरती होऊन डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर ऑगस्ट 2018 ते 2020 पर्यंत कंपनी 10 मध्ये कार्यरत होता. सन 2020 ते आतापर्यंत पीपीसीएम म्हणून कंपनी 10 मध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने सनिराम नरोटे याचेवर 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर समुराम नरोटे हा जन मिलिशीया सदस्य असून महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 2 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. सदर दोन्ही नक्षलवाद्यांचा खुन, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत असल्याची माहिती यावेळी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

 

सदर दोन्ही नक्षलवाद्यांची (Naxalites) विचारपूस केली असता, यांना वरिष्ठ नक्षलवादी कॅडरकडून उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पूर्ववत करण्याकरीता पाठविल्याबाबतची माहिती त्यांनी दिली. मात्र, या दोघांच्या अटकेमुळे त्यांच्या विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यास गडचिरोली पोलिस दलाला यश मिळाले आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकूश घालण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. नक्षलवाद्यांच्या हालचालीवर गडचिरोली पोलिस दल अधीक लक्ष ठेवून आहे. नक्षलवद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी केले आहे. पत्रपरिषदेला पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अप्पर पोलिस समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे आदी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News