पारशिवनी:- सुन्नी रजा मस्जिद ट्रस्ट पारशिवनी तर्फे ईद मिलादुन्नबी निमिताने आज रविवार दि ९ ऑक्टोबर रोजी सुन्नी रजा मस्जिद बाजार चौक पारशिवनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तेव्हा या शिबिरात ईद मिलादुन्नबी निर्मिताने सर्वधर्मिय युवक , युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानातून सामाजिक एकात्मतेचा संदेश द्यावा , असे आवाहन आयोजक सुन्नी रजा मस्जिद टूस्ट तर्फे करण्यात आले आहे .
पारशिवनी शहरात हिंदू , मुस्लिम तसेच इतर धर्मिय नागरिक एकत्र येऊन प्रत्येक सण ईद मिलादुन्नबी, उत्सव साजरे करत असतात . जाती , धर्माच्या नावाखाली शहरात कधीही वैचारिक गोंधळ झाला नाही . हे पारशिवनी शहराचे वैभव आहे . या भव्यरक्तदान शिबिरा दरम्यान सुन्नी रजा मस्जिद ट्रस्ट च्या वतीने ईद मिलादुन्नबी निमिताने क्षेत्रातिल सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवराचा शाल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे असे सुन्नी रजा मस्जिद ट्रस्ट च्या वति ने सागण्यात आले .