कमलसिंह यादव

प्रतिनिधी

पारशिवनी दिंनाक ८/१०/२०२२. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विरोधावर टिका करित असताना सलूनवाला आठवला. मात्र कोरोना काळात हाच सलूनवाला ठाकरे यांनी सत्ता असुनही दुर्लक्षित केलेला होता. कोरोनाच्या काळात उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण लाॅकडाउन केले होते. त्यामुळे नाभिक समाजाचे सलून सुध्दा बंद होते. कालांतराने लाॅकडाउन मध्ये शितीलता देण्यात आली मात्र नाभिक समाज बांधवाचा सलून व्यवसायावर बंदी होती. त्यांमुळे नाभिक समाज आर्थिक दृष्ट्या डबघाईला आला असल्याने उपासमारीने त्राही. त्राही होऊन आपल्या कुटुंबातील लोकांना वाचविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना नाभिक महामंडळाच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन सलून व्यावसायिकांना आथीँक मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले. किंवा सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विनंती केली. मात्र उद्धवजी ठाकरे यांनी नाभिक समाज बांधवांची कसल्याही प्रकारची मदत केली नाही. परिणामी राज्यातील ४० नाभिक बांधवांनी आथीँक टंचाई मुळे व कोरोना काळात हतबल होऊन व कुटुंबातील सदस्याचे हाल सहन न झाल्याने अखेर आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. तरीही साहेबांनी नाभिक समाज बांधवांची दखल घेतली नाही. किंवा त्यांना तेव्हा सलूनवाला आठवला नाही. हे विशेष. सत्तेवर असताना त्यांनी नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी स्थापना करण्यात आलेल्या केशसिल्पी महामंडळ सुध्दा बरखास्त करून नाभिक समाजाची थट्टा केली. तेव्हा पण सलूनवाला आठवला नाही. मात्र मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले व ज्यांच्या मुळे आजी चे माजी झाले. त्यांच्यावर टीका करण्यासाठी मात्र ठाकरे साहेबाना कधी न आठवणारा सलूनवाला झालेल्या दसरा मेळाव्यात मात्र हाच दुर्लक्षित सलूनवाला आठवला हे नाभिक समाज बांधवांना आचार्याचा धक्का देणारा असल्याचे नाभिक महामंडळ सरचिटणीस गोपाल कडू यांनी म्हटले आहे. मुख्यमंञी मा. एकनाथजी सिंधे नाभिक समाजाची दखल घेणार?……… महाराष्ट्रात वास्तव्यात असलेला नाभिक समाज हा अल्पसंख्याक असुन आपला पारंपरिक सलून व्यवसाय करतात. व आपला प्रपंच चालवतात. नाभिक समाज हा अल्पसंख्याक असुन सुध्दा ना नौकरीत. शिक्षणात आरक्षण लागू करण्यात आले नाही. त्यामुळे नाभिक समाज आथीँक कुचंबणा सहन करत आपले जीवन जगत आहे. अल्पसंख्याक असल्याने समाजाला वेळोवेळी इतर समाजातील लोक छळत असतात. अनेक वेळा अत्याचार केले जाते. त्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाद्दारा सरकार कडे नाभिक समाज बांधवांना सुरक्षितता मिळावी म्हणून अँक्टिसीटी अँक्ट चे संरक्षण कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. पण महाराष्ट्र सरकारने लक्ष दिले नाही. मात्र इतर राज्यांत नाभिक समाज बांधवांना आरक्षण व सुरक्षितता बहाल करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आरक्षण लागू करण्यात यावा. महाराष्ट्रात केशसिल्पी मंडळ स्थापन करण्यात यावे. नौकरीत व शिक्षणात आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सरचिटणीस गोपाल कडू यांनी एकनाथ सिंधे मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com