ऋषी सहारे
संपादक
आरमोरी:-
धान्य कापणीच्या कामाला वेग आलेला असल्याने धानाच्या कडपा जमा करण्यासाठी सिंधीची गरज पडते त्याकरिता रामाळा (आरमोरी)येथील आनंदराव दुधबळे हे आपल्या सहकाऱ्यासोबत सकाळी 8 वाजता वैरागड रोडवर कूप क्र.41 येथे सिंध तोडत असताना वाघाने हल्ला करून दुधबळे यांचा जीव घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व तीन मुली असा मोठा आप्त परिवार आहे.
यात एक हात तोडल असून मानेचा भाग अर्ध तुटला आहे.
तीन किलोमीटर पर्यंत फरटत नेल्या मुळे
सिटी 1 च वाघ असावा असा संशय वन विभागास असून एवढं क्रूर तोच असावा.
वरील घटनेमुळे रामाला परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची कापणी, मळणी कशी करावी हा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाघा चा बंदोबस्त करा अन्यथा मोठा आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात असून वनवी भागाने उपाय करावा असे बोलल्या जात आहे.