माझा बळीराजा शेतकरी सुखी आणि समृद्धी ठेवून त्याचे आरोग्य उत्तम लाभू दे…. — माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गणरायाला साकडे… — राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे स्वागत करुन कुटुंबीयांनी मनोभावे आरती करून मूर्तीची स्थापना केली..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          भरणेवाडी तालुका इंदापूर येथे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे स्वागत करून मनोभावाने पूजा व आरती करून गणरायाची स्थापना केली.

          गणपतीच्या स्वागतानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे बोलत आसताना म्हणाली की,तालुक्यातील व राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य उत्तम लाभू दे, बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी गणरायाकडे केलेली आहे.

            गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमदार दत्तात्रय भरणे मिडीयासी बोलताना म्हणाले की, आम्ही प्रथे प्रमाणे कुटुंबातील सर्व जन एकत्रपणे सन साजरा करतो. मात्र गणेश उत्सव हा सण आम्हाला अधिकची ऊर्जा नेहमीच देत आसतो. गणरायाची कृपा संपूर्ण इंदापूर तालुक्यावर असल्याने, नागरिकांना लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत.

            गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद नेहमीच अधिकचे काम करायला बळकटी देतो. तालुक्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना कोणत्याही अडचणी आगामी काळात येऊ नयेत, सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गणरायाला साखडे घातले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

              भरणेवाडी(ता.इंदापूर) येथे राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता.7 सप्टेंबर) रोजी सकाळी विधीवत पूजा करण्यात आली.

            तसेच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देत उपस्थितांना मोदकाचे वाटप करत गणरायाची प्राणप्रतिष्ठा आमदार दत्तात्रय भरणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे व कुटुंबीयांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आली.