वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
मानव हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक असून तो विविध क्षेत्रांमध्ये आपले कार्य करत असतो. यातीलच एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे समाजसेवक आणि समाज सेवा करणारे अनेक तरुण युवक युवती सामाजिक कार्यकर्ते हे निस्वार्थ भावनेने कार्य करीत असतात. जे सामाजिक कार्य व समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा सर्वांगीण विकासातून देश सेवा आणि जनजागृतीच्या कार्यातून आपला अमूल्य वेळ हा समाजाच्या कल्याणासाठी विधीत करतात. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन व नवीन कार्य करण्याची प्रेरणा या तरुण युवा सामाजिक कार्यकर्त्यांकरिता व सामजिक संघटना संस्था यांना मिळावे म्हणुनी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार हा क्रीडा व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हास्तरावर क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा पातळीवर दरवर्षी प्रदान करण्यात येत असतो. मात्र वाशिम जिल्ह्यातील 2017 पासून हे पुरस्कार अध्यापक ही पात्र असून त्या लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले नाही. याकरिता सामाजिक कार्यकर्ते आशिष धोंगडे व उल्हास ठाकरे यांनी दि.६ सप्टेंबर रोजी, जनकल्याण संपर्क कार्यालय वाशिम येथे निवेदनाद्वारे वाशिम जिल्ह्याच्या खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे केली आहे.
युवक – युवती, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांकडून दरवर्षी पुरस्कार करिता आर्ज मागविण्यात येतात. या प्राप्त झालेल्या आर्जा मधून दरवर्षी ५ ते ६ पुरस्कार साठी व्यक्तींची निवड केली जाते. २६ जानेवारी प्रजासत्ता किव्हा १ मे महाराष्ट्र दीनी हे पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा आधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्ह्याचे खासदार,आमदार आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातात. मात्र वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत हे पुरस्कार मात्र पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने त्यांच्यामध्ये निराशाची भावना निर्माण होत आहे.
त्यांना पुढील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावर हे पुरस्कार प्रदान न केल्या गेल्यामुळे पुढील वाटचाल करिता निकश मधी गुणवत्ता कमी पडत आहे.
मात्र क्रीडा विभागाला इतरत्र कार्यासाठी निधी उपलब्ध आहे. परंतु या पुरस्कारासाठी निधी उपलब्ध नाही का..? असा प्रश्न मात्र पात्र लाभार्थ्यांकरून केला जात आहे.. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाच्या अगोदर हे पुरस्कार पात्र लाभार्थी यांना प्रदान करण्यात यावे व पुढील राष्ट्रीय पुरस्कार हा 12 जानेवारी रोजी प्रदान केला जातो. राष्ट्रीय पुरस्कार करिता प्रस्ताव पाठवण्यात करिता या जिल्हा युवा पुरस्काराचा गुण मिळावे फायदा व्हावा ही बाब आपण लक्षात घेऊन लवकरात लवकर हे पुरस्कार प्रदान करण्यात यावे अशी मागणी आशिष धोंगडे , उल्हास ठाकरे व सामाजिक कार्यकर्ते यांनी खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.