९० ‘आशा ‘ गीतांचा कार्यक्रम, ५५ संगीतकारांच्या रचना!…  — ९० व्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांना मानवंदना…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक 

पुणे विभागीय 

        पुणे : विख्यात गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या आणि ५५ संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या ९० गाण्यांचा ‘आशा-९०’ हा शुभारंभाचा प्रयोग १५ सप्टेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.’आरती दीक्षित, पुणे’ निर्मित हा कार्यक्रम दि. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर (पुणे) इथे आयोजित करण्यात आला आहे. भक्ती गीत, भावगीत, कव्वाली, मुजरा, गझल, लावणी अशा बहारदार रचनांचे वाद्यवृंदासह सुरेल सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. ३ तासात ९० गाणी सादर करून आशा भोसले यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

          आरती दीक्षित, जितेंद्र पेठकर आणि आकाश सोळंकी हे गायक आशा भोसले यांची ९० गीते सादर करणार आहेत.संगीत संयोजन राजेश देहाडे (संभाजीनगर) यांचे आहे. देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी पत्रकाद्वारे दिली.देणगी प्रवेशिकांसाठी ९८२२७०९७३० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.पुण्यानंतर राज्यभरात हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दि.१६ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे हुतात्मा स्मृती मंदिर येथेही रात्री ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.