ऋषी सहारे
संपादक
आरमोरी- ग्रामपंचायत डोंगरसावंगी गावातील जल शुद्धीकरण केंद्र व ए.टी एम मशीन मागील दोन महिण्या पासुन बंद असल्यामुळे ग्रामवासीय शुद्ध जलापासून वंचित राहवे लागत आहे.मात्र केंद्रातून काही लोकांना रक्कम घेऊन शुध्द पाणी पुरवठा केला जात आहे . या रक्कमेचा मागे पुढे गैरप्रकार होऊ शकतो.हा भोंगळ कारभार थांबवा व नादुरुस्त जलशुद्धीकरण केंद्र,व ए.टी.एम मशीन दुरुस्त करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नीलिमा कोडाप, उषा रोहनकर व भोलेनाथ धानोरकर इत्यादींनी केली आहे. सदरील योजना स्वामीत्व घननिधी सन २०१८- १९२०अंतर्गत जलशुद्धीकरण करणे प्रकल्प व ए.टी.एम. आरो प्रणाली सन २०२१-22 पंचायत समिती आरमोरी च्या वतीने सुरू करण्यात आली.परंतु मागील दोन महिन्यापासून जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे .पण आतून काही नागरिकांना रक्कम घेऊन पाणीपुरवठा केला जातो. आणि बाहेरून समस्त ग्रामस्थ वाशियांना बंद अशा स्थितीत आहे .या जलशुद्धीकरणाची एटीएम नादुरुस्त मशीन पोळ्याच्या दिवशी देसाईगंज येथील ठेकेदार दुरुस्तीस घेऊन गेले.परंतु अजून पर्यंत दुरुस्ती करून आणून दिले नाही .या नादुरस्त मशीनचा विद्युत बिल तेरा हजार रुपये आलेला असून तो कसे व का भरावे हा प्रश्न ग्रांमपंचायत सदस्यां पुढे निर्माण झालेला आहे .या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव यांना भ्रमंणध्वनि वरून विचारणा केली असता मी पंचायत समितीच्या मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले .करिता लवकरात लवकर जलशुद्धीकरण केंद्र व एटीएम मशीन सुरू करण्यात यावी व समस्त ग्रामवासी यांना शुद्ध जल पेय पाणी मिळण्यात यावे .अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने होत आहे.